80+Gudi Padwa Marathi Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
80+गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे विजय चिन्ह. हा सण कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात उगाडी आणि महाराष्ट्रात गुढी पाडवा म्हणून ओळखला जातो. * चैत्र महिन्यातील या तिथीनुसार सर्व युगांतील सतयुगाची सुरुवातही याच तिथीपासून झाली असे मानले जाते
80+Gudi Padwa Marathi Wishes, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
- नवीन दिवस, नवीन सकाळ चला एकत्र साजरे करूया हा बाहुल्यांचा सण आहे आपण सदैव एकत्र राहावे हीच प्रार्थना
- सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष,
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श,
हिंदू नव वर्षाच्या आणि
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! - वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गायी मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! - चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरवात…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- आपण सर्व
गुढीपाडव्याच्या
शुभेच्छा - वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! - दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! - येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा ! - चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! - गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
Gudi Padwa Marathi Wishes
- चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाट नवा आरंभ नवा विश्वास,
नव्या वषाची हिच तर खरी सुरुवात.. गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा… - आयुष्याची गोडी वाढवणारा चैत्र आला चला करू पुन्हा नव्याने सुरूवात एका चैतन्याच्या अध्यायाला..गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
- पडता दारी पाऊल गुढीचे, आनंदी आणि मांगल्यमय होई जग सारे, या सणाला करू आनंदाचा जल्लोष कारण आले आहे हिंदू नववर्ष
- पाडव्याची नवी पहाट, घेऊन येवा तुमच्या आयुष्यात सुखाची लाट, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
- गुढीपाडवा आला आहे सुखसमृद्धीचा क्षण आला आहे नवा प्रवास नवा ध्यास घेऊन आला आहे आजचा दिवस खास
- रेशमी गुढी, कडुनिंबाचं पान, हे वर्ष तुम्हाआम्हा सगळ्यांना जावो छान, आमच्या कुटुंबातर्फे तुम्हाला नववर्षानिमित्त सदिच्छा. हॅपी गुढीपाडवा.
- श्रीखंडपुरीची लज्जत, गुढी उभारण्याची लगबग, सण आहे आनंदाच आणि सौख्याचा तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
- पुन्हा होईल सर्व सुरळीत सांगत आहे नववर्ष
दूर होईल मनावरचं मळभ आणि होईल हर्ष
आनंदी राहा आणि गुढीपाडवा साजरा करा - गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
Gudi Padwa marathi quotes
- निळ्या निळ्या आभाळी शोभे ऊंच गुढी…
नवे नवे वर्ष आले वेऊन गुळसाखरेची गोडी…
गुढीपाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा… - सण आला सौख्याचा पण काळजी घ्या
सण आणि शुभेच्छा देण्याच्या नादात
कोरोनाची करू नका साथ
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा - नववर्ष आला आता आपला फळांचा राजा पण येणार
मग तयार व्हा आणि नववर्षात ताव मारायला
नववर्षाच्या आंबामय शुभेच्छा - वसंताची चाहूल घेऊन येते नववर्ष
सर्वांच्या मनात या निमित्ताने पुन्हा होऊ दे हर्ष
नववर्षाच्या चैतन्यमय शुभेच्छा - यंदाही दिली नाही कोरोनाने भेटीची परवानगी
लांब राहून आपणही करूया त्याची रवानगी
गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा - लांब असू आपण या वर्षीही नाही होणार गाठीभेटी
तरी गुढी उभारताना आईबाबा नक्कीच होईल इमोशनल तुमची बेटी
मिस यू आईबाबा…गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
Gudi Padwa marathi images
- नक्षीदार काठावरी रेशमी वस्त्र त्याच्यावर चांदिचा लोटा,
उभारूनी मराठी मनाची गुढी, साजरा करुया हा गुदीपाडवा नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!! - इंग्रजी नववर्षाच्या सुरूवातीला शुभेच्छा देण्यापेक्षा हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा देणं जास्त महत्त्वाचं आहे.
- नवी सकाळ, नवी उमेद, नवे संकल्प, नवा आनंद..तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गुडी पाडव्याच्या शुभेच्छा
- चारी दिशांना आनंदाची आहे बहार..गोड श्रीखंड आणि पुरीचा आहे स्वाद..दारी सजली आहे रांगोळी..आसमंतात आहे पतंगाची रांग..नववर्ष तुम्हा-आम्हाला जावो समाधानाचं
- आनंद होवो ओव्हरफ्लो..मस्ती कधीही न होवो लो..धनधान्याचा होवो वर्षाव..असं जाओ तुम्हाला नववर्षाचं पर्व
- तुम्हाला मिळो गणपतीचा आशिर्वाद..विद्या मिळो सरस्वतीकडून..धन मिळो लक्ष्मीकडून..प्रेम मिळो सगळ्यांकडून..पूर्ण होवो प्रत्येक इच्छा..हॅपी गुडीपाडवा
- दिवस उगवतो दिवस मावळतो वर्ष येतं वर्ष जातं पण प्रेमाचे बंध कायम रहातात, आपलं नातं असं दरवर्षी वृद्धिंगत व्हावं हीच सदिच्छा, सर्वांना नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
- गुढी उभारली असेल आज तुमच्याही दारी, चैतन्य आहे आज सर्वदारी…चला उत्साहाने साजरा करू नववर्षाचा हा आनंदोत्सव…शुभ गुढीपाडवा.
- आयुष्य एका स्वप्नासारखे जगावे..प्रत्येक संवेदनेला जगून पाहावे..नववर्षाची नवी पहाट अनुभवताना..आपल्या सर्वांना मिळो नवी वाट..हॅपी गुढीपाडवा
- April 3, 2024
- No Comments